विराट कोहली: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ईडन गार्डन्सवर होणारा सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. आज त्यांचा 35 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशीच त्याने आव्हानात्मक खेळपट्टीवर लढाऊ अर्धशतक झळकावून भारताला चांगल्या स्थितीत आणले. यासोबतच अनेक विक्रमही त्याच्या नावावर झाले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्माने 24 चेंडूत 40 धावा केल्या. त्याचवेळी गिल २३ धावा करून बाद झाला आणि डाव पुढे नेण्याची जबाबदारी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरवर पडली.
विराट कोहलीने सावध फलंदाजी करत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपला डाव खेळला. कोहलीने वाढदिवसाच्या दिवशी शानदार शतक साजरे केले आहे.
सुरवातीपासून जपून खेळत असलेला कोहली परीस्थीतीची जाणीव ठेवून फलंदाजी करत स्कोरकार्ड वाढवत चालला होता. त्याने आधी श्रेयस अय्यरसोबत तर नंतर राहुल, जडेजा सोबत छोट्या छोट्या भागीदारी करून संघाची धावसंख्या वाढवली.
IND vs SA LIVE: विराट कोहलीने ठोकले शानदार शतक,101 धावांची खेळी..
आपल्या या खेळीमध्ये विराट कोहलीने 121 चेंडूचा सामना करत नाबाद 101 धावा काढल्या. एकदिवशीय क्रिकेट कारकिर्दीतील त्याचे हे 49 वे शतक ठरले आहे. विराटच्या या खेळीने चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त रिटर्ण गिफ्ट मिळाल असच म्हणाव लागेल. विराटच्या 49 व्या शतकाची चाहते गेल्या अनेक दिवसापसुन वाट पाहत होते.
अखेर शेवटी तो दिवस आला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी.. विराटच्या या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 326 धावा काढल्या असून दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकायचा असेल तर 327 धावा काढाव्या लागणार आहेत. दक्षिण आफ्रिका हे लक्ष पार करू शकेल का? हे पाहणे आता रंजक ठरणार आहे..
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी