विराट कोहली ठरला पुन्हा किंग… ऑस्ट्रोलीयाविरुद्ध 85 धावांची खेळी करतात मोडला सचिनचा आणखी एक विक्रम, आता या बाबतीत ही सचिनच्या समोर निघाला किंग कोहली.

विराट कोहली World cup Records

विराट कोहली ठरला पुन्हा किंग… ऑस्ट्रोलीयाविरुद्ध 85 धावांची खेळी करतात मोडला सचिनचा आणखी एक विक्रम, आता या बाबतीत ही सचिनच्या समोर निघाला किंग कोहली.


विश्वचषक 2023 मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रोलीयाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरले तर लोकेश राहुल आणि विराट कोहली. या दोघांनी संघाला अडचणीतून बाहेर काढत हा विजय मिळवून दिला. कोहलीने 85 धावांची तर लोकेश राहूलने नाबाद 97 धावांची खेळी केली.

विराट कोहली ठरला पुन्हा किंग..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आयसीसी स्पर्धेत आणखी एक मोठा विक्रम झाला आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आणि तो आपल्या नावावर केला. आता विराट आयसीसी टूर्नामेंटमध्ये कोहलीच्या पुढे गेला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर असला तरी तो खूपच मागे आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या सामन्याची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, परंतु विश्वचषक सामना पूर्णपणे वेगळा आहे. टीम इंडियाच्या सुपरस्टारने या सामन्यात आपली ताकद दाखवण्यासाठी अशी संधी निवडली जेव्हा आघाडीचे तीन फलंदाज खाते न उघडताच माघारी परतले होते.

भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांत आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि आघाडीच्या तीन फलंदाजांना खाते न उघडताच माघारी धाडले. त्यांनतर फलंदाजीस आलेल्या विराट कोहलीने  उत्कृष्ट फलंदाजी केली  त्याने टीम इंडियाला अडचणीतून तर सोडवलेच पण आयसीसी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला.

विराट कोहली

या बाबतीत विराट कोहली निघाला सचिनच्या  पुढे!

विराट कोहली आता ICC टूर्नामेंटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयसीसी टूर्नामेंटमध्ये 58 डावात 2719 धावा केल्या होत्या. हा विक्रम विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना मोडला. या महान फलंदाजाने आयसीसी टूर्नामेंटच्या 64 व्या डावात 2720 धावा करत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. 64 डावांनंतर त्याच्या खात्यात 2422 धावा जमा आहेत.


PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *