विराट कोहली: आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील 17 व्या सामन्यात भारताने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजले. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने अक्षरशः धावांचा पाऊस पडला. त्याने 97 चेंडूत 103 धावांची नाबाद शतकी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले त्याचे हे 48 वे शतक होते.
भारताला विजयासाठी 20 धावांची गरज होती आणि त्यावेळेस विराट कोहलीला देखील शतक पूर्ण करण्यासाठी 20 धावांची गरज होती. त्यावेळेस विराटने आपली कार्य कुशलता दाखवत धडाकेबाज खेळी केली आणि शतक ठोकले. विराटने शतक पूर्ण करण्यासाठी के.एल. राहुलला स्ट्राइक न देता 20 धावा होईपर्यंत तो खेळत राहिला. विराटचे शतक होऊ नये म्हणून बांगलादेशी गोलंदाज हे जाणून बुजून वाईड चेंडू फेकत होते. अखेर जिद्दीने पेटलेल्या विराटने त्याचे शतक पूर्ण करूनच राहिला.
युवराज- रैना- कैफ नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे भारताचा सुपरमॅन: विश्वचषकात घेतले आहेत सर्वाधिक झेल
Ind vs Ban: विराट कोहलीने रचला विराट विक्रम, एकाच चेंडूत ठोकल्या तब्बल 14 धावा..
भारताच्या डावात 13वे शतक टाकण्यासाठी बांगलादेश कडून हसन मोहम्मद गोलंदाजीसाठी आला होता. यावेळेस त्यांनी पहिलाच चेंडू नोबॉल टाकला आणि त्याच्या षटकात एक दोन नव्हे तर तब्बल 14 धावा काढल्या. पहिल्या चेंडूवर विराट कोहलीने दोन रन केले, मात्र हा चेंडू नोबॉल होता. यानंतर फ्री हिट देण्यात आले. विराटने त्यावर चौकार मारला. गोलंदाजाचे दुर्दैव होते की, तो चेंडू देखील नोबॉल होता. त्याही चेंडूवर त्याने फ्री हिट्सचा फायदा घेत एक मोठा षटकार ठोकला. अशा तऱ्हेने विराट कोहलीने एकाच चेंडू तब्बल 14 धावा काढल्या.
सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान विराट कोहलीच्या जबरदस्त शतकी खेळीच्या जोरावर 41.3 षटकात 261 धावात तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे.
Three players,
One heartbeat,
An Unstoppable Team🏏🏏#ViratKohli #KLRahul #RohitSharma #INDvBAN #LeoDisaster #DarshanHiranandani #MahuaMoitraExposed #HaramiMahua #HardikPandya pic.twitter.com/RjKXZIy0PV— RisingTiranga👁️👁️ (@alpsrules) October 20, 2023
धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत हे पहिले शतक ठोकले आहे. तर विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचे हे दुसरे शतक ठरले. या विजयासह भारताचे गुणतालिकेत आठ अंक झाले असून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा चार सामन्यापैकी हा तिसरा पराभव आहे.
भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोंबर रोजी रविवारी होणार आहे. बांगलादेशचा हा चार सामन्यातला तिसरा पराभव आहे. बांगलादेशला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी यापुढचे प्रत्येक सामने जिंकावे लागणार आहे. जरी बांगलादेश ने पुढचे सर्व सामने जिंकले तरी त्यांचे सेमी फायनलचे रस्ते अवघड झाले आहेत.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी