विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू: क्रिकेटच्या मैदानात फलंदाज मोठी धावसंख्या करून जागतिक विक्रम बनवतात. तर गोलंदाज विकेट काढून आपले कौशल्य दाखवात, तर क्षेत्ररक्षक आपल्या फिल्डिंगने थक्क करुन सोडतात. अनेकदा क्षेत्ररक्षकाकडून थरारक झेल पकडले जातात. या कॅचेस पाहिल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसत नाही. विश्वचषकात देखील असे अविश्वसनीय झेल पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू देखील कॅचेस घेण्यामध्ये मागे नाहीत. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल घेण्यात भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या भारतीय खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल घेतलेत.
या 7 खेळाडूंनी विश्वचषकात घेतले आहेत सर्वाधिक झेल
विराट कोहली: विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचे नाव सर्वात पुढे आहे. त्याने 29 सामन्यात 17 कॅचेस घेतले आहेत. सर्वोत्तम फलंदाजांसोबत तो उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. मैदानात नेहमी तो आपली चपळाई दाखवून देतो. विराट कोहली आणखीन एक विश्वचषक खेळु शकतो. त्यामुळे या विक्रमात आणखीन भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनिल कुंबळे: भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 अप्रतिम झेल घेतले आहेत. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यात त्याने कॉट अँड बोल्ड झेल जास्त घेतलेले आहेत.
कपिल देव : माजी कर्णधार चॅम्पियन खेळाडू कपिल देव यांनी 25 सामन्यात तब्बल 12 झेल घेतले आहेत. 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यांमध्ये धावत जाऊन रिचर्ड्स यांचा घेतलेला झेल भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. कारण या झेलमुळे भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरता आले.
सचिन तेंडुलकर: विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा चौथ्या स्थानी आहे. त्याने 44 सामन्यात केवळ 12 झेल घेतले आहेत.
वीरेंद्र सेहवाग: भारताचा माजी सलामवीर वीरेंद्र सेहवाग याने 22 सामन्यात 11 झेल घेतले आहेत. सेहवाग आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये सर्वाधिक वेळा स्लिप मध्ये थांबून क्षेत्ररक्षण करताना दिसून यायचा.
मोहम्मद अझरुद्दीन: भारताचा माजी कर्णधार आणि सर्वात चपळ असलेला खेळाडू म्हणजेच मोहम्मद अझरुद्दीन. अझरुद्दीन यांनी 30 सामन्यात 11 झेल घेतले आहेत.
जहीर खान: सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याचे देखील नाव आहे. त्याने 10 झेल घेतले आहेत. सुपरमॅन सुरेश रैना याने 12 सामन्यात नऊ तसेच के श्रीकांत यांनी नऊ झेल टिपले आहेत. जहीर खान, सुरेश रैना, के श्रीकांत हे सध्या क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर उमेश यादव च्या नावावर आठ सामन्यात आठ झेल घेतल्याची नोंद आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी