क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वात बेईमान खेळाडू: क्रिकेट खेळाला सज्जनांचा खेळ म्हणतात. ज्यामध्ये खेळाडू पूर्ण इमानदारीने खेळताना दिसतात परंतु खेळाडू सामना जिंकण्यासाठी मैदानात सर्व काही करण्यास तयार असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मैदानात चुकीचा खेळ केला आणि त्यांचा चुकीचा खेळ तिसऱ्या डोळ्यात म्हणजेच कॅमेऱ्यात कैद झाला.
आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगत आहोत ज्यांनी मैदानात सुरु असलेल्या सामन्यात उघडपणे बेईमानी केली आहे.
हे आहेत क्रिकेटमधील सर्वात बेईमान खेळाडू
1.रिकी पाँटिंग:
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट इतिहास पाहिला तर त्यांचा इतिहास बेईमानीने क्रिकेट खेळण्यात भरलेला आहे. अशाच प्रकारे एका कृत्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंगला बेईमान बनवले.
खरं तर, 2007-08 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, जिथे सिडनी कसोटीदरम्यान सौरव गांगुली मायकल क्लार्कने ग्राउंडला हात लावल्यावर झेलबाद झाला होता, त्यानंतर रिकी पाँटिंगने अंपायरने आऊटचा इशारा दिला होता. त्यावर अंपायरने गांगुलीला आऊट घोषित केले.
मायकेल क्लार्कने चेंडू नीट पकडला नाही हे टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते. पंचांच्या निर्णयानंतर रिकी पाँटिंग माहिती असून खरे सांगू शकला नाही. आणि त्याने गांगुलीला तरीही बाद केलेला निर्णय मान्य केला होता.या एका फाऊलमुळे रिकी पॉन्टिंगची कारकीर्द कलंकित झाली..
२.मायकेल क्लार्क:
रिकी पाँटिंग प्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा अनुभवी मायकेल क्लार्कनेही फाऊल खेळण्याचा अवलंब केला. भारताविरुद्धच्या सामन्यात मायकल क्लार्क फलंदाजी करत होता.
भारताचा गोलंदाज अनिल कुंबळेच्या चेंडूने मायकल क्लार्कच्या बॅटला अलगद लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या द्रविडच्या हातात पडला. ज्यावर मायकल क्लार्कने मैदान सोडण्यास नकार दिला. नंतर पंचांनी क्लार्कला बाद घोषित केले. आपण बाद आहोत हे क्लीअर माहिती असूनही त्यावेळी क्लार्कने स्वतःहून मैदान सोडले नाही. ज्यामुळे क्रिकेट इतिहासात त्याची इमेज खराब झाली होती..
3.शाहिद आफ्रिदी:
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार ‘शाहिद आफ्रिदी’. पाकिस्तान चा हा कर्णधार सुद्धा क्रिकेटच्या मैदानात फसवणूक करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. शाहिद आफ्रिदी एका सामन्यादरम्यान बॉल टॅम्परिंग करताना दिसला होता. 2010 मध्ये, शाहिद आफ्रिदीने टी-20 सामन्यादरम्यान दाताने चेंडू चघळताना पकडल्यानंतर त्याच्या कृत्याबद्दल त्याने माफी मागितली होती. मात्र हा सामना झाल्यानंतर सोशल मिडीयावर आणि जागतिक क्रिकेट मध्ये आफ्रिदीची चांगलीच बदनामी झाली होती..
4.अहमद शहजाद:
पाकिस्तानचा सलामीवीर अहमद शहजाद यालाही अशाच प्रकारे उघडपणे मैदानात खोटारडेपणा दाखवतांना पकडण्यात आले होते. 2015 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा दौरा केला होता. जिथे अहमद शहजादने एक झेल घेतला जो टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होता की तो जमिनीवर आदळला होता, परंतु अहमद शहजादने फाऊल केला आणि कोपराने तो घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याने अवघड झेल पकडल्यासारखे वाटू लागले. चेंडू जमिनीवर टेकला हे माहिती असूनही यावेळी अहमदने मुद्दाम अपील करत पंचांवर दबाव निर्माण केला होता .
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..