Most Runs In PSL: बाबरच ठरला पीसीएल मधला हिरो, वाचा पीएसएल मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची यादी..

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

 Most Runs In PSL:  पीएसएल 2024 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायटेड ने मुलतान सुलतानचा आठ गडी आणि दहा चेंडू राखून पराभव करत चषक आपल्या नावे केला. या सामन्यात इमाद वसीमने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच चा किताब देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पीसीएल मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची माहिती घेऊयात.

Most Runs In PSL: बाबर आझम ठरला सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू..

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने पेशावर जाल्मी संघाकडून खेळताना 11 सामन्यात 569 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. नाबाद 111 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तो पीएसएल मध्ये सर्वाधिक धावा काढणारा  खेळाडू ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत तो जबरदस्त फॉर्मत दिसून आला, पण आपल्या संघाला तो चषक जिंकून देऊ शकला नाही.

 Most Runs In PSL: बाबरच ठरला पीसीएल मधला हिरो, वाचा पीएसएल मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची यादी..

पीएसएल मध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर उस्मान खान राहिला. त्याने मुलतान सुलतान कडून खेळताना साथ सामन्यात 430 धावा केल्या ज्यात दोन अर्धशतके व दोन शतकाचा समावेश होता. त्याच्या बॅटमधून नाबाद 106 धावांची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली.

मुलतान सुलतानचा कर्णधार मोकमद रिजवान याने बारा सामन्यात 407 धावा केल्या होत्या. त्यात चार अर्धशतकाची नोंद आहे. 82 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. आपल्या संघाला चषक मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अंतिम सामन्यात त्याने संथ गतीने फलंदाजी केल्याचा फटका त्याच्या संघाला बसला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज रासी वॅनडेर डुसेन आयपीएल मध्ये लाहोर कलंदर्स संघाकडून खेळत होता. त्याने सात सामन्यात 364 धावा केल्या आहेत. यंदाच्या पीसीएल मध्ये सर्वाधिक धावा काढणारा तो एकमेव विदेशी खेळाडू आहे. नाबाद 104 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्या नावे तीन अर्धशतके व एका शतकाची नोंद आहे.

Most Runs In PSL: बाबरच ठरला पीसीएल मधला हिरो, वाचा पीएसएल मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची यादी..

सॅम अयुब याने पेशावर जाल्मी संघाकडून खेळताना 11 सामन्यात 345 धावा केल्या होत्या. त्यात दोन अर्धशतके ठोकली आहेत. 88 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.