Hardik Pandya Health Update: हार्दिक पांड्याच्या तब्येतीबद्दल मोठी अपडेट..! संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो हार्दिक, असे झाल्यास या 4खेळाडूंपैकी एकाला मिळेल संधी.

Hardik Pandya Health Update: भारतात सध्या विश्वचषक 2023 खेळवला जात आहे. विश्व चषकाचे लीग सामने सध्या खेळवले जात आहेत. जवळपास संपूर्ण 10 संघांनी आतापर्यंत 2 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. टीम इंडियाची कामगिरी या विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वांत भारी राहिली आहे.  २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी आतापर्यंत सर्व काही ठीक चालले होते आणि भारतीय संघ एकापाठोपाठ एक संघांना पराभूत करून पुढे जात आहे. पण दरम्यान, संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाल्याने संघ व्यवस्थापनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हार्दिक पांड्या विश्वचषक 2023:

आता हॉस्पिटलमध्ये चेकअप केल्यानंतर हार्दिक पंड्याच्या तब्येतीविषयी बीसीसीआयने एक मोठी अपडेट दिली आहे. नकी काय आहे जाणून घेऊया सविस्तर.

हार्दिक पांड्या होऊ शकतो संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर..

 हार्दिक पंड्या याआधीच न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी तो उपलब्ध नसेल असी माहिती बीसीसीआयने कालच जाहीर केली होती. मात्र आता हार्दिक पांड्याचे रिपोर्ट्स बीसीसीआयच्या अधिकार्यांनी पहिले असून तो लवकर संघात पुनरागमन करेल की नाही याबद्दल त्यांना आजूनही सास्वती नाही. असेही होऊ शकत की, हार्दिक संपूर्ण विश्वचषक संपेपर्यंत सुद्धा फिट होऊन मैदानावर परतू शकणार नाही.

अश्या स्थिती मध्ये बीसीसीआयने आतापासूनच दुसरा मार्ग तयार करण्यास सुरवात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने हार्दिक पंड्याच्या जागी 4 खेळाडूंची नावे रोहित शर्माला सुचवली आहेत. चला तर मग जाणून घेऊया, जर हार्दिक पंड्या संपूर्ण विश्व चषक स्पर्धेतून बाहेर पडला तर हार्दिक पांड्याऐवजी संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.

हेही वाचा: विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक.. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर .अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग 11 चा भाग होऊ शकणार नाही. हे लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन त्याच्या बदलीसाठी सातत्याने शोध घेत होते. मात्र, आता हा शोध संपला असून त्याची जागा घेऊ शकणाऱ्या 4 खेळाडूंची नावे समोर आली आहेत.

हार्दिक पांड्या ऐवजी या 4 खेळाडूंपैकी एकजण घेऊ शकतो पांड्याची जागा.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला हार्दिक पांड्याचा बदली खेळाडू सापडला असून, त्यांनी सर्व खेळाडूंची यादी कर्णधार रोहित शर्माकडे सोपवली आहे. आता संपूर्ण प्रकरण रोहितच्या हातात आहे की तो कोणत्या खेळाडूला खेळवणार?.. त्या खेळाडूंच्या यादीत शिवम दुबे, विजय शंकर, दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावांचा समावेश आहे.

रोहित शर्मा कोणत्या खेळाडूला संधी देईल ?

Hardik Pandya Health Update

हे चारही खेळाडू अतिशय आश्वासक असून त्यांचा संघात समावेश केल्याने संघाला खूप बळ मिळेल. पण कर्णधार हिटमॅन रोहित शर्माच्या दृष्टीकोनातून पाहिले तर, तो हार्दिक पांड्याऐवजी शिवम दुबेला संधी देऊ शकतो. त्यामागे शिवमची उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी आहे. त्याचा अलीकडचा फॉर्म खूपच उत्कृष्ट आहे, त्याने यापूर्वी आयपीएल 2023 मध्ये चेन्नईसाठी चमकदार कामगिरी केली होती.

यासह नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु हार्दिक तंदुरुस्त होऊन मैदानात परतेल अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. आणि जर हार्दिक 29 ऑक्टोबर पर्यंत संघात  सहभागी झाला नाही तर मात्र रोहित शर्माला नक्कीच या खेळाडूंचा विचार करावा लागू शकतो.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *