IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’! विराट-गावस्कर-युवराजला टाकले पाठीमागे!

IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा 'सिक्सर किंग'! विराट-गावस्कर-युवराजला टाकले पाठीमागे!

IND vs ENG:  नव्या दमाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल हा प्रत्येक सामन्यागणिक नव-नवीन विक्रम रचत आहे. प्रत्येक सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. अवघ्या 9 कसोटी सामन्यात 16 डाव खेळून त्याने 1000 धावा केल्या आहेत. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वात कमी सामन्यात हजार धावा पूर्ण करणारा तो खेळाडू बनला आहे. त्याने 9 कसोटीत 29 षटकार ठोकले आहेत. 

आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणाऱ्या या 22 वर्षीय खेळाडूने अशी कामगिरी केली आहे की, जे विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन व युवराज सिंग सारख्या दिग्गज खेळाडूंना देखील जमली नाही. सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, युवराज सिंग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर,केएल राहुल, शिखर धवन या खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये जयस्वाल इतके देखील षटकार ठोकले नाहीत. जयस्वालच्या कारकीर्दला तर आता सुरुवात झाली आहे.

यशस्वी जयसवाल

‘रनमशीन’ विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दत अनुक्रमे 26 षटकार ठोकले आहेत. के एल राहुल 24, युवराज सिंग 22, रवी शास्त्री 22, द्रविड 21 तर मोहम्मद अझरुद्दीन यांनी 19 षटकार ठोकले आहेत. शिखर धवन 12, माजी सलामीवीर गौतम गंभीर 10 तर संकटमोचक या नावाने प्रसिद्ध असलेला माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याने तर केवळ पाच षटकार ठोकले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नावावर आहे. त्याने 128 षटकार लगावले आहेत. भारतीय खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये वीरेंद्र सेहवाग हा सहाव्या स्थानावर आहे त्याने 104 कसोटीमध्ये 91 षटकार मारले आहेत.

मालिकेविषयी बोलायचे झाले तर ,भारताने या मालिकेमध्ये इंग्लंडला 3-1ने हरवत मालिका या अगोदरच जिंकली आहे. भारताच्या या विजयामध्ये यशस्वी जयस्वाल चा मोठा हात आहे त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. यात दोन दमदार द्विशतकाचा तर दोन अर्धशतकाचा समावेश आहे.  या मालिकेत भारताने पाच युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली आहे. रजत पाटीदार सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाशदीप या युवा खेळाडूंना टेस्ट कॅप मिळाली आहे.

IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा 'सिक्सर किंग'! विराट-गावस्कर-युवराजला टाकले पाठीमागे!

IND vs ENG :आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांचा इतिहास.

भारत आणि इंग्लंड 1932 पासून 135 कसोटी सामने खेळले आहेत. एकूणच, इंग्लंडने 51 विजय मिळवले आहे, तर भारताने 34 जिंकले आहेत. भारतात, यजमानांनी 58 पैकी 25 सामने जिंकले आहेत.  भारताने हा सामना जिंकला तर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत पहिल्या स्थानावर संघ आपले स्थान कायम राखेल. यापूर्वी 2014 साली दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतात झाली होती तेव्हा इंग्लंडने भारताला 4-1अशा फरकाने हरवले होते. महेंद्रसिंग धोनी च्या नेतृत्वाखाली खेळत असताना देखील भारताचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा बदला भारताने या मालिकेत घेतला, असे म्हटले तरी हरकत नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IND vs ENG: आरारर.. खतरनाक! हा रेकॉर्ड बनवून आर अश्विन ठरला जगातील एकमेव खेळाडू आहे, वाचा सविस्तर.

 WPL: 31 वर्षीय खेळाडूने WPL मध्ये इतिहास रचला, हा रेकॉर्ड बनवणारी पहिली महिला फलंदाज.