World Cup 2023: गतवेळच्या चॅम्पियन इंग्लंड संघासाठी आली गुड न्यूज; वेगाचा बादशहा मानला जाणारा खेळाडू होतोय संघात सामील.

0
2

World Cup 2023: गतवेळचा चॅम्पियन असलेल्या इंग्लंडच्या संघाला यंदाच्या स्पर्धेत फारशी छाप सोडता आला नाही. 2019 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून विश्वचषकावर पहिल्यांदा नाव कोरले होते. या स्पर्धेत मात्र त्यांचे दोन हुकमी एकके म्हणजेच बेन स्टोक्स आणि वेगाचा बादशहा जोफ्रा आर्चर (jofra archer) हे अनफिट असल्यामुळे ते बेंचवर बसून सामने पाहत आहेत. त्यातच भरीस भर म्हणून अफगाणिस्तानने इंग्लंडला हरविले असल्यामुळे संघाचे मनोबल तुटले आहे. दरम्यान, इंग्लंडच्या संघासाठी आता एक सुखद बातमी समोर आली आहे.

World Cup 2023: जोफ्रा आर्चर (jofra archer) करतोय इंग्लंड संघात पुनरागमन, विश्वचषक स्पर्धेत घालणार धुमाकूळ ?

World Cup 2023: गतवेळच्या चॅम्पियन इंग्लंड संघासाठी आली गुड न्यूज; वेगाचा बादशहा मानला जाणारा खेळाडू होतोय संघात सामील.

वेगाचा बादशहा मानला जाणारा जोफ्रा आर्चर (jofra archer) हा संघात पुन्हा एकदा कम बॅक करतोय. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याची इंग्लंड संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे त्याला पर्यायी खेळाडू म्हणून स्थान मिळाले होते. सध्या जोफ्राचा सराव करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तो धावण्याचा सराव करतोय. या व्हिडिओवरून पुढच्या सामन्यात तो कमबॅक करेल असे सर्वांना वाटत आहे.

जोफ्रा आर्चरला कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दुखापतीने घेरले आहे. तो कधी पाठ दुखीमुळे तर कधी हाताच्या दुखापतीमुळेच आयसीसी चे मोठे इव्हेंट मिस केलाय. 2023 मध्ये झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यात केवळ तो पाच सामन्यात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करू शकला. यात त्याला केवळ तीन बळी घेता आले. त्याने त्याचा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध मार्चमध्ये खेळला होता. जोफ्राचे संघात पुनरागमन झाल्यास इंग्लंडच्या संघाला चांगला फायदा होऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jofra Archer (@jofraarcher)

World Cup 2023: जोफ्रा आर्चर क्रिकेट कारकीर्द.

28 वर्षे जोफ्रा आर्चरने इंग्लंडच्या संघाकडून खेळताना 21 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये 42 गडी बाद केले आहेत. 2019 मध्ये इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यासाठी त्याने खारीचा वाटा उचलला होता. त्याने विश्वचषकातील 11 सामन्यात 20 गडी बाद केले. त्याचे संघात पुनरागमन झाल्यास जोश बटलरचे टेन्शन कमी होऊन संघाची ताकद वाढू शकते. आर्चरच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा ही ख्रिस वोक्सच्या खांद्यावर आहे. मात्र तो यंदा लईत दिसून येत नाही. सॅम करनच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही.

World Cup 2023: गतवेळच्या चॅम्पियन इंग्लंड संघासाठी आली गुड न्यूज; वेगाचा बादशहा मानला जाणारा खेळाडू होतोय संघात सामील.

इंग्लंडचा पुढचा सामना 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या कामगिरीवर नजर टाकली असता संघाने केवळ तीन सामन्यात एकच विजय मिळवला आहे. यापुढे इंग्लंडची पराभवाची मालिका कायम राहिल्यास गतवेळच्या चॅम्पियन संघाला यंदा मात्र रिकामी हाताने माघारी परतावे लागेल.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here