एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारे पाकिस्तानी गोलंदाज: एकदिवशीय सामन्यात टी-२० पेक्षा जास्त धावा गोलंदाजाना बसतात. एकदिवशीय सामन्यात सुरवातीला जरी खेळाडू जपून खेळत असले तरी नंतर शेवटच्या षटकांत ते गोलंदाजावर हल्ला चढवतात. अश्या स्थितीमध्ये गोलंदाजाला भरपूर धावा द्यावा लागतात.
अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांना कित्येक वेळा 100 हून अधिक धावा पडल्या आहेत. विरोधी संघाच्या फलंदाजांनी अक्षरशा त्यांचे वाभाडे काढले होते. आज या फिचरमध्ये आम्ही तुम्हाला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या 5अश्या गोलंदाजाविषयी माहिती देणार आहोत. ज्यांना अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवशीय सामन्यात सर्वाधि धावा पडल्या होत्या. चला तर जाणून घेऊया नक्की कोण आहेत ते गोलंदाज.
अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या या 5 गोलंदाजांनी एकदिवशीय सामन्यात दिल्यात सर्वाधिक धावा..
1. बहाव रियाझ
पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज बहाव रियाझ एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्यायादीत सर्वांत वर आहे. त्याने 30 ऑगस्ट 2016 रोजी नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध दहा षटकांत 110 धावा दिल्या होत्या. या काळात त्याची सरासरी 11 धावा प्रति षटक होती तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 169 धावांनी पराभव केला होता.
२.बिलावल भाटी
View this post on Instagram
25 वर्षीय पाकिस्तानी वेगवान गोलंदाज बिलावल भाटी हा देखील अशा पाकिस्तानी गोलंदाजांपैकी एक आहे ज्याने त्यांच्या षटकांच्या कोट्यात जास्त धावा खर्च करण्याचा विक्रम केला आहे. भाटीने 3 फेब्रुवारी 2015 रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध 9.30 धावा प्रति षटक या दराने दहा षटकांत 93 धावा लुटावल्या होत्या. शिवाय या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 119 धावांनी पराभव केला होता.
३.हसन अली

26 जानेवारी 2017 रोजी पाकिस्तानचा 22 वर्षीय वेगवान गोलंदाज हसन अलीने अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ षटकांत 100 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने प्रति षटक ११.११ धावा देत दोन विकेट घेतल्या. या सामन्यात कांगारू संघाने पाकिस्तानचा ५७ धावांच्या फरकाने पराभव केला होता.
४.नावेद-उल-हसन
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा नावेद-उल-हसन हा पाकिस्तानचा पाचवा गोलंदाज आहे. नावेदने 4 फेब्रुवारी 2007 रोजी सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठ षटकांत 11.50 च्या सरासरीने 92 विकेट घेतल्या. या काळात त्याने दोन विकेट्सही घेतल्या. तर दक्षिण आफ्रिकेने हा सामना 164 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
तर मित्रांनो हे होते हे 4 पाकिस्तानी गोलंदाज ज्यांनी एकदिवशीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा दिल्या आहेत. यांची कामगिरीपाहून त्यांची कारकीर्द लवकरच संपणार हे जवळपास निच्छित झाले होते आणि घडलेही तसेच. त्यांची अंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काल लांब चालू शकली नाही.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी