कधी फी भरण्यासाठी 275 रुपये ही नव्हते, आज आहे भारतीय क्रिकेट संघाची शान, ‘या’ खेळाडूंची कहाणी वाचून व्हाल प्रेरित..

Rohit Sharma Success Story:  भारताने सलग १० सामने जिंकून २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. आता 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. कर्णधार रोहित शर्माने ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले आहेत.

IND vs NZ live: पहिल्या सेमिफायनलमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, ख्रिस गेल ला मागे सोडत केली अशी कामगिरी..

पण असं म्हणतात की मेहनत केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती प्रगती करत नाही. रोहित शर्माचीही अशीच अवस्था आहे, ज्याने आपल्या जीवनात गरिबीपासून सर्वसामान्यांना वाटणाऱ्या सर्व दु:खांचा सामना केला आहे. हे आम्ही म्हणत नसून रोहित शर्माला जगातील महान कर्णधार आणि क्रिकेटपटू बनवणारे त्यांचे माजी प्रशिक्षक दिनेश लाड यांनी हे सांगितले आहे.

माजी प्रशिक्षकाने रोहित शर्माची सांगितली कहाणी, वाचून वाटेल अभिमान.

 

रोहित शर्माचे माजी प्रशिक्षक दिनेश लाड यांनी आमच्याशी केलेल्या खास संवादात सांगितले की, रोहित शर्माला बॅट्समन नव्हे तर स्पिनर बनायचे होते. त्याने सांगितले की, रोहित डोंबिवली, मुंबई येथे स्ट्रीट क्रिकेट खेळायचा. प्रशिक्षक दिनेश लाड म्हणतात की, माझी नजर पहिल्यांदाच एका सामन्यादरम्यान रोहित शर्मावर पडली.

दिनेश लाड पुढे म्हणाले,

 

कधी फी भरण्यासाठी 275 रुपये ही नव्हते, आज आहे भारतीय क्रिकेट संघाची शान, 'या' खेळाडूंची कहाणी वाचून व्हाल प्रेरित..

“जेव्हा रोहित माझ्याकडे आला तेव्हा त्याच्याकडे फी भरण्यासाठी 275 रुपयेही नव्हते. त्याची प्रतिभा पाहून शाळेने त्याला मोफत प्रशिक्षण दिले. आज मला आनंद आहे की, रोहित हा पांढर्‍या चेंडूचा जबरदस्त फलंदाज बनला आहे.”

19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्याबाबत दिनेश लाड म्हणाले की, रोहितने अंतिम सामन्यात फलंदाजीची लय कायम राखली पाहिजे. रोहित संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत विश्वचषक जिंकेल, अशी मला आशा आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *