SA vs NED: नवख्या नेदरलँडच्या कर्णधाराने 36 वर्षांपूर्वीचा कपिल देव यांचा मोडला ‘हा’ विक्रम

0

SA vs NED: विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये मंगळवारी धर्मशाळाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नेदरलँड सारख्या नवख्या संघाने दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले. अफगाणिस्तानच्या पावलावर पाऊल टाकत नेदरलँडने हा ऐतिहासिक विजय मिळवल्याने रातोरात हा संघ स्टार बनला. नेदरलँडच्या या विजयाचा खरा हिरो ठरला तो संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Andrew Edwards) . त्याने संघासाठी 69 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी खेळली. या खेळीसह त्याने माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांचा विक्रम मोडला आहे.

Heath Streak :स्कॉट एडवर्ड्स (Scott Andrew Edwards) ने मोडला कपिल देव यांच्या 96 वर्षांपूर्वीचा विक्रम 

SA vs NED: विश्वचषक स्पर्धेत पुन्हा दुसरा उलट फेर; नेदरलॅंड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाजले पाणी..

SA vs NED: सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या स्कॉटने कर्णधाराला साजेशी अशी खेळी करत माजी कर्णधार कपिल देव यांचा एक 36 वर्षांपूर्वी केलेला विक्रम देखील त्याने मोडीत काढला. या सामन्यात स्कॉटने 69 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी केली. यात त्याने दमदार दहा चौकाराने एक षटकार ठोकला. 1987 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सातव्या क्रमांकावर खेळताना कपिलदेव यांनी नाबाद 72 धावांची खेळी केली होती. तब्बल 36 वर्षानंतर स्कॉटने 78 धावा काढून त्यांचा हा विक्रम मंगळवारी मोडीत काढला. सामन्यात कर्णधार म्हणून खेळताना सातव्या क्रमांकावर केलेली ही सर्वात मोठी खेळी आहे.

या खेळाडूंनी विश्वचषकामध्ये सातव्या क्रमांकावर येऊन काढल्यात सर्वाधिक धावा.

 नाथन कुल्टर नाईल (Nathan Coulter-Nile)

2019 मधील विश्वचषकात वेस्टइंडीज विरुद्ध सातव्या क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कुल्टर नाईल याने 60 चेंडूत 90 धावांची तडाखेबाज खिळे केली होती मात्र या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नव्हता.

हिट स्ट्रीक (Heath Streak)

SA vs NED: नवख्या नेदरलँडच्या कर्णधाराने 36 वर्षांपूर्वीचा कपिल देव यांचा मोडला 'हा' विक्रम
Heath Streak

2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिट स्ट्रीक (Heath Streak) याने सातव्या क्रमांकावर न्यूझीलंड विरुद्ध खेळताना नाबाद 72 धावा काढल्या होत्या. याच विश्वचषकात श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध 68 धावांची खेळी केली होती.

सामन्यात नेदरलँडच्या संघाने धमाकेदार प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघाला 38 धावांनी पराभूत करत साऱ्यांना चकित करून सोडले. नेदरलँड्सने दिलेले 246 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेचा संघ करू शकला नाही. 207 धावांवर सर्व संघ बाद झाला. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला 43 षटकात 246 धावांचे आव्हान मिळाले होते.

SA vs NED: नवख्या नेदरलँडच्या कर्णधाराने 36 वर्षांपूर्वीचा कपिल देव यांचा मोडला 'हा' विक्रम

नेदरलँडच्या संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेवर हा त्यांचा दुसरा विजय ठरला आहे. या विजयामुळे नेदरलँडच्या खात्यात दोन गुणांची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे चार सामन्यात तीन विजयासह सहा गुणांची नोंद झाली आहे. गुणतालिकेत हा संघ न्यूझीलंड नंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

 यापूर्वी नेदरलँडच्या संघाने विश्वचषक पात्रता फेरीमध्ये वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वे सारख्या अनुभवी संघाला हरवून विश्वचषकामध्ये धडाकेबाज एन्ट्री मिळवली होती.नेदरलँड्सच्या या एका विजयाने त्यांचा आत्मविश्वास खूपच  वाढला असेल, एवढ मात्र नक्की..!


Leave A Reply

Your email address will not be published.