IND vs BAN: भारत विजयाचा चौकार मारणार की बांगलादेश करणार उलटफेर? पुण्याच्या मैदानावर आज रंगणार भिडंत

विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील 17व्या सामन्यात आज भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यावर सामना रंगणार आहे. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. फलंदाजास अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर चौकार-षटकारांची आतिशबाजी क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे. विश्वचषकात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना नमवून आता बांगलादेशचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ भारतीय संघाचा विजयी रथ रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येईल. 

IND vs BAN: कोण कोणावर भारी?

भारत आणि बांगलादेश  (IND vs BAN) यांच्यात आतापर्यंत एक दिवसीय क्रिकेटमध्ये 40 सामने आपसात झाले आहे. त्यापैकी 31 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर आठ सामन्यात बांगलादेशने आपल्या बाजूने निकाल लावला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ चार वेळा आपसात लढले असून भारतीय संघाने तीनदा तर बांगलादेशला एका सामन्यात विजय मिळाला आहे.

2007 मध्ये वेस्टइंडीजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने भारताचा पाच गडी राखून पराभव केला होता. या पराभवाची सल भारतीय संघाच्या मनात आजही कायम आहे. कारण या पराभवानंतर भारतीय संघ थेट स्पर्धेबाहेर गेला होता. भारताचे यापूर्वी या मैदानावर सात सामने झाले आहेत त्यापैकी चार सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत.

वर्ल्ड कप 2023 : इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कर्णधार रोहीत शर्मा, बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित मोडू शकतो हा मोठा विक्रम..

IND vs BAN सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ ( IND vs BAN Probable Playing 11)

भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयश अय्यर, के एल राहुल हे धुरंदर फलंदाज तुफान फार्मात आहेत. बुमराह, सिराज, जडेजा, कुलदीप पंड्या ही भारताची बॉलिंग लाईन मजबूत आहे. आजच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी आर. अश्विन खेळू शकतो. तर श्रेयश अय्यर याला विश्रांती देऊन त्याच्या जागेवर सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळू शकते. तसेच मोहम्मद सिराज यालाही संघ व्यवस्थापन विश्रांती देण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते.

2021 मध्ये झालेल्या तीन सामन्यात भारतीय संघाने याच मैदानावर 300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या संघाने देखील याच मैदानावर 300 पेक्षा धावा दोनदा केल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील धावांचा पाऊस पडू शकतो. नेट सेशनमध्ये देखील भारतीय संघाने केवळ पॉवर हिटीगवर भर दिला होता.

ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार 'शाकिब अल हसन'कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?

2015 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मेलबर्नच्या मैदानावर रोहित शर्मा ने 137 धावांचे धडाकेबाज खेळी केली होती. त्यानंतर 2019 मध्ये बर्गिहमच्या मैदानावर 104 धावांची विजय खेळी साकारली होती. या सामन्यात जर त्याने शतक ठोकले तर बांगलादेश विरुद्ध सलग तीन सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.

IND vs BAN: शुभमन गीलकडे असेल सर्वांचे लक्ष.

या सामन्यात शुभमन गिलकडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत. पाकिस्तान विरुद्ध त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. विराट, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, मात्र तो पहिल्या दोन सामन्यात 85 आणि 55 धावांची नाबाद खेळी केली होती.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब उल हसन याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही हा मोठा प्रश्न बांग्लादेशपुढे उपस्थित झाला होता. मात्र आता तो सामन्यासाठी फिट झाला आहे. बांगलादेशला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. अन्यथा त्यांचा सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचा रस्ता पूर्णतः बंद होऊन जाईल.

IND vs BAN: भारत विजयाचा चौकार मारणार की बांगलादेश करणार उलटफेर? पुण्याच्या मैदानावर आज रंगणार भिडंत

लिटन दास व मेहदी हसन मिराज याना प्रत्येकी एक अर्धशतक ठोकण्यात यश मिळाले आहे. पण नजमुल हसन, शंटो, तौहीद हृदय सारख्या युवा खेळाडूंनी या विश्वचषकात निराश केली आहे. मधल्या फळीतील फलंदाज मुशफिकुर रहीम हाच एकमेव खेळाडू फार्मात आहे. भारतीय संघाचे फलंदाज डावखुऱ्या फिरकी गोलंदाजापुढे डगमगताना दिसून येतात. त्यामुळे आजच्या सामन्यात डाव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू नासूम अहमद याला संधी मिळू शकते. एकंदरीतच आजचा सामना हा चांगलाच अटीतटीचा पाहायला मिळू शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *