IPL Records:  आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा ‘हा’ आहे पहिला विदेशी खेळाडू,आतापर्यंत या 12 खेळाडूंनी जिंकलीय मानाची ऑरेंज कॅप!

0
18
आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा 'हा' आहे पहिला विदेशी खेळाडू!
ad

IPL Records:  2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएल ही क्रिकेट लीग स्पर्धा सुरू केली. या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून ऑरेंज कॅप दिली जाते. ऑरेंज कॅप मिळवण्यामध्ये भारतीय तसेच विदेशी खेळाडूंमध्ये चांगली स्पर्धा नेहमीच रंगलेली पाहायला मिळते. आतापर्यंत सहा भारतीय खेळाडूंनी तर सहा विदेशी खेळाडूंनी ही कॅप पटकावली आहे.  चला तर जाणून घेऊया कोण कोणत्या खेळाडूंनी जिंकली आहे ‘ऑरेंज कॅप’?

Cricket 1

IPL Records:आयपीएलच्या इतिहासात या खेळाडूंनी जिंकली आहे ऑरेंज कॅप!

1.ख्रिस गेल

‘युनिव्हर्सल बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेला वेस्टइंडीज चा धडाकेबाज माजी फलंदाज ख्रिस गेल हा आयपीएल मध्ये दोनदा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. 2011 आणि 2012 मध्ये अनुक्रमे 608 व 733 धावा केल्या. 2008 पासून आयपीएलमध्ये खेळताना त्याने एक स्वतःचा वेगळा धाक निर्माण करत अनेक विक्रम रचले आहेत. लीगमध्ये त्याने बंगळूर आणि केकेआर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

IPL RECORDS: ख्रिस गेलची अशी इनिंग ज्यात गोलंदाजांना अक्षरशा रडू कोसळले होते, मारले होते तब्बल एवढे षटकार की आजही विक्रम तुटेना..!

2.शॉन मार्श

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शॉन मार्श याने 2008 मध्ये पहिल्यांदा 616 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. या धमाकेदार कामगिरीनंतरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघामध्ये निवडण्यात आले होते. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. सध्या त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

3.मॅथ्यू हेडन

माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याने 2009 मध्ये ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यावेळी तो चेन्नई सुपर किंग संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने 572 धावा केल्या होत्या.

4.सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी 2010 साली ऑरेंज कॅप मिळवले होते. 618 धावासह ऑरेंज कॅप मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

5.माइक हसी

2013 साली ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइक हसी याने 733 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो चेन्नई सुपर किंग संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.

6.रॉबिन उत्तपा

2014 मध्ये केकेआर कडून खेळताना रॉबिन उत्तपा याने ऑरेंज कॅप मिळवली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये छाप सोडणाऱ्या या खेळाडूला आपली कारकीर्द जास्त वेळ लांबवता आली नाही.

IPL 2013 moment: The Gayle 'storm' that recorded T20 cricket's fastest  century

7.विराट कोहली

‘चेसमास्टर’ विराट कोहली याला 2016 मध्ये ऑरेंज कॅप मिळवण्यात यश आले. त्याने सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या

8. डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 2017 मध्ये 641 धावा तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याने 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना 735 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती.

9. के एल राहुल

के एल राहुल याने 2020 मध्ये धमाकेदार कामगिरी करत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्याने 670 धावा केल्या होत्या.

IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!

 10. ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने 2021 मध्ये 635 धावा तर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोश बटलर याने 2022 मध्ये 863 धावा करत ऑरेंज कॅप मिळवण्यात यश मिळवले.

11.शुभमन गिल

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने 2023 मध्येचमकदार कामगिरी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 890 धावा करत त्याने ऑरेंज कॅप मिळवली होती. त्याच्या या बहारदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल मध्ये विजेतेपद पटकावले होते.

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

  या 5 खेळाडूंना घाईघाई मध्ये बनवले होते संघाचे कर्णधार, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू. 

IPL: हे 4 खेळाडू जे मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडून दुसऱ्या संघात जाऊन कर्णधार बनले, एकाने तर चक्क रोहित शर्मा ला खुन्नस दिली.