Viral Video: श्रेयस अय्यरने मारला एवढा जबरदस्त षटकार की, रोहित शर्माची पत्नी उठून पळाली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: श्रेयस अय्यरने मारला एवढा जबरदस्त षटकार की, रोहित शर्माची पत्नी उठून पळाली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

क्रिकेटच्या ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी आमच्या whatsapp Group ला जॉईन व्हा..

====

श्रेयस अय्यर:  विश्वचषक 2023 मध्ये आज भारत आणि श्रीलंका (Ind vs sl) यांच्यात साखळी सामना खेळवला जात आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करतांना टीम इंडियाने ८ गडी गमावून 357 धावा काढल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचे विशाल लक्ष दिले आहे.

Viral Video: श्रेयस अय्यरने मारला एवढा जबरदस्त षटकार की, रोहित शर्माची पत्नी उठून पळाली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

भारतीय संघाच्या फलंदाजीवेळी  टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत विशेष काही करू शकला नाही, मात्र त्याने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध झटपट अर्धशतक झळकावले. गिलने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान अप्रतिम फटकेबाजी केली.

 

श्रेयस अय्यरने लगावला विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत लांब षटकार ( (Longest six in worldcup 2023)..

या सामन्यात श्रेयस अय्यरने इतका लांब षटकार मारला की, विश्वचषक 2023 चा विक्रम मोडला गेला. होय, अय्यरने श्रीलंकेविरुद्ध १०६ मीटरचा षटकार मारला, जो या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार आहे. (Longest six in worldcup 2023)

मात्र, अय्यरच्या 106 मीटर षटकाराने रोहित शर्माची पत्नी रितिका हिला धोका निर्माण झाला होता. ३६व्या षटकात अय्यरने ओव्हरपीच चेंडू लाँग ऑनवर पाठवला आणि सीमारेषा ओलांडली. हा षटकार इतका लांब होता की, समोरच्या व्हीआयपी सीटवर बसलेल्या रितिका सजदेहपर्यंत चेंडू पोहोचला. चांगली गोष्ट म्हणजे रितिका बॉल पाहत होती आणि ती योग्य वेळी तिची जागा सोडून पळून गेली. अश्विनची पत्नी प्रीती आणि युजवेंद्र चहल-धनश्री देखील रितिकासोबत बसले होते.

रोहितच्या कामगिरीमुळे रितिका नाराज,सोशल मिडीयावर फोटो व्हायरल..

बरं, या सामन्यात रितिकाला मन दुखावलं होतं. वास्तविक तिचा पती रोहित शर्मा अवघ्या 4 धावा करून बाद झाला. पहिल्या चेंडूवर रोहितने चौकार मारला पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. रोहित दिलशान मधुशंकाचा स्लोअर चेंडूवर बाद झाला त्यांनतर केमेरामेनची नजर रितिका वर गेली आणि रितिकाचा पडलेला चेहरा सर्वांच्या समोर आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विराट-गिलने टीम इंडियाला सावरत लोकांचे मन जिंकले..

रोहित बाद झाला पण विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने मन जिंकले. या दोन फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची मोठी भागीदारी केली. मात्र, खेदाची बाब म्हणजे या दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. गिलने 92 धावांवर आपली विकेट गमावली. तर विराट कोहली ८८ धावा करून बाद झाला. मधल्या षटकांमध्ये केएल राहुल २१ धावा करून बाद झाला आणि सूर्यकुमार यादव १२ धावा करून बाद झाला, मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने तुफानी खेळी खेळून टीकाकारांना शांत केले.

श्रीलंकेचा संघ आता 358 धावांचे लक्ष पार करू शकतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. चालू सामन्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जोईन व्हा..


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *