Virat Kohli Birthday Special: विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी बीसीसीआयने शेअर केला खास, व्हिडीओ, सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..

Virat Kohli Birthday Special: विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी बीसीसीआयने शेअर केला खास, व्हिडीओ, सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..

Virat Kohli Birthday Special:  भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कोहली आता 35 वर्षांचा झाला आहे आणि या निमित्ताने तो कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल. हा सामना जिंकून टीम इंडिया कोहलीला गिफ्ट देऊ इच्छित आहे.

Happy Birthday Virat Kohli...! एकदिवशीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने खेळलेल्या 'या' 5 खेळ्या त्याला क्रिकेटचा किंग बनवतात..

विराटचा वाढदिवस खास बनवण्यासाठी आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.(Virat Kohli Birthday Special video)

या व्हिडिओमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, युवा फलंदाज शुभमन गिल, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

गिलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की,

Virat Kohli Birthday Special: विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी बीसीसीआयने शेअर केला खास, व्हिडीओ, सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..

“कोहलीची खेळाची भूक खूप जास्त आहे. गिलने त्याच्याइतकी खेळाची भूक आणि उत्कटता कोणामध्येच पाहिली नाही.” त्यामुळे “विराटने भारतीय क्रिकेटबद्दलची विचारसरणी बदलली आहे”

बुमराहने असेही सांगितले की, “इतका काळ क्रिकेट खेळूनही त्याचे खेळाप्रतीचे समर्पण कमी झालेले नाही. “तो दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या खेळात सुधारणा करत राहतो.”

पांड्या या महान फलंदाजाबद्दल म्हणाला, “त्याचा फिटनेस खूप चांगला आहे आणि तो नेहमी खेळावर लक्ष केंद्रित करतो. अशा परिस्थितीत तो सर्व खेळाडूंना प्रेरणा देतो. याशिवाय तो चाहत्यांना प्रेरणाही देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “विराट या खेळाचा एक महान फलंदाज आहे आणि तो सर्व फॉरमॅटमध्ये खूप चांगला खेळाडू आहे पण विशेषत: एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. गेल्या काही वर्षांत त्याने चमकदार कामगिरी केली आहे आणि तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे.  कोहलीच्या वाढदिवशी विजय मिळवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल, तर विराटलाही त्याच्या वाढदिवसानिमित्त शतक झळकावायचे आहे.


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *