रविचंद्रन अश्विनला आदर्श मानणाऱ्या 16 वर्षाच्या अफगाणिस्तानी खेळाडूला केकेआर ने दिली संघात एंट्री,आयपीएल 2024 मध्ये करणार राडा..

SRH vs MI: हैद्राबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची केली धुलाई, उभा केला आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा स्कोर..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानचा स्टार फिरकेपटू मुजीब उर रहमान हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुजीब उर रहमान हा दुखापतीमुळे या सिझनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. कोलकत्ता नाईट रायडर्स ने त्याच्याजागी पर्यायी खेळाडूची घोषणा केली आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स ने 16 वर्षाच्या एका खेळाडूला संघात सामील केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स ने मुजीब उर रहमान याच्या जागे 16 वर्षाच्या अल्लाह मोहम्मद गजनफर या अफगाणिस्तानी खेळाडूला संघात सामील करून घेतले आहे. अल्लाह गजनफर याला 20 लाख रुपयाच्या बेस प्राईस मध्ये केकेआर ने खरेदी केले. त्याने अफगाणिस्तान संघाकडून दोन वनडे सामने खेळले आहेत तसेच या खेळाडूने 3 टी 20 आणि सहा लिस्ट येथे सामने देखील खेळले. यात अनुक्रमे पाच आणि चार विकेट घेतले आहेत. 

सहा फूट दोन इंच उंच असलेला अल्लाह मोहम्मद गजनफर हा फिरकीपटू असून रविचंद्र अश्विनी याला आदर्श मानतो. त्याने टेनिस क्रिकेट पासून आपली सुरुवात केली होती. केकेआर ने अंतिम 11 जणांच्या संघात त्याला सामील करून घेतले तर तो आयपीएल मधला दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरेल.

SRH vs MI: हैद्राबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची केली धुलाई, उभा केला आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा स्कोर..!

केकेआर चा संघ एका विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सध्या हा संघ जबरदस्त फॉर्मत असून त्यांचे सर्वच खेळाडू फिट आहेत. त्यामुळे  यंदाही केकेआरकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. केकेआरडी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 साली आयपीएल चषकावर नाव कोरले होते. यंदा गौतम गंभीर हा केकेआर चा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआर चा संघ कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गौतम गंभीर कडून केकेआर ला पुन्हा एकदा चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. मागील वर्षी श्रेयश अय्यर हा दुखापतीमुळे पूर्ण स्पर्धेला मुखला होता यंदा तो फिट असून संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. मागील वर्षी त्याच्या जागी नितीश राणा हा संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत होता. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. 

केकेआर ने दहा वर्षांपूर्वी आयपीएल चषकावर नाव कोरले होते. यंदा या संघातील खेळाडू खूपच जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विजयाचा दहा वर्षाचा दुष्काळ यावर्षी संपेल अशी क्रिकेट प्रेमींना आशा आहे.

आयपीएल 2024 साठी कोलकाता नाइट रायडर्स संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, मनीष पांडे,शेरफेन रदरफोर्ड, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, सुनील नरेन, केएस भरत, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, फिल सॉल्ट, रहमानउल्ला गुरबाज. अरोरा, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, चेतन सकरिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, दुष्मंथा चमीरा, शकीब अल हसन, अनुकुल रॉय, अल्लाह मोहम्मद गझनफर.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *