पहिल्याच दिवशी पाकिस्तानचे खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल, 2 किलोमीटरची रेस अर्ध्यातूनच सोडली, पहा व्हायरल व्हिडीओ.

पहिल्याच दिवशी पाकिस्तानचे खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये फेल, 2 किलोमीटरची रेस अर्ध्यातूनच सोडली, पहा व्हायरल व्हिडीओ.

pakistan players fitness test: जूनमध्ये वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने तयारी सुरू केली आहे. खेळाडू हे तंदुरुस्त रहावे, यासाठी आर्मीसोबत ट्रेनिंग सुरू केली आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ इटाबाबाद येथे आर्मी सोबत सराव सुरू केला आहे. या ट्रेनिंग कॅम्प मधून एक महत्त्वपूर्ण बातमी येत आहे. ती म्हणजे पाकिस्तानच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट. फिटनेस टेस्टच्या पहिल्या दिवशी 2 किलोमीटर धावण्याची रेस लावण्यात आली होती. मात्र ही रेस पूर्ण करण्यामध्ये काही खेळाडू फेल गेले.

पाकिस्तानचा युवा यष्टिरक्षक फलंदाज आजम खान याला फिटनेस टेस्ट पूर्ण करता आली नाही. तो केवळ दीड किलो मीटर धावू शकला. दीड किलोमीटरची रेस पूर्ण करण्यासाठी त्याला 20 मिनिटे लागले. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या व वजनदार शरीरयष्टी असलेल्या या खेळाडूला आपला फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. यावरून पाकिस्तानी खेळाडूंचा फिटनेस लक्षात येतो. 

पाकिस्तानी खेळाडूंना गुरु भेटेना, प्रशिक्षक पदाची ऑफर घेऊन पीसीबी गेली 'या' खेळाडूच्या दारात..!

दोन किलोमीटरची रेस पूर्ण करण्यासाठी युवा खेळाडू इरफानुल्लाह नियाझी हा सर्वात पुढे होता. पहिल्या दिवसाच्या 2 km रेस मध्ये तो सर्वात अव्वल होता. त्याने सहा मिनिटे आणि 47 सेकंदात ही रेस पूर्ण केली.

 

आजम खान याला ही रेस पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटे लागले तर मोहम्मद रिजवान यांनी आठ मिनिटे 26 सेकंद घेतले. मोहम्मद हरीश, नसीम शाम, हसीब उल्ला आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना आठ मिनिटे सत्तावीस सेकंद लागले. वेगवान शाहीन शहा आफ्रिदी याला आठ मिनिटे 37 सेकंद लागले. सलमान अली आगा याने 9 मिनिटे 20 सेकंद तर मोहम्मद अमीर यांनी नऊ मिनिटे 30 सेकंद घेतले. शादाब खान याने नऊ मिनिटे 56 सेकंद आणि मोहम्मद नवाज याने नऊ मिनिटे 57 सेकंद घेतले.

पाकिस्तान संघाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा बाबर आजम याच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यांनी या फिटनेस टेस्टमध्ये सहभाग घेतला नाही. बाबर सध्या सौदी अरब मध्ये आहे तो 28 मार्चपासून कॅम्प मध्ये जॉईन होणार आहे. इमाद वसीम, फकर जमान आणि हरीश राउफ हे फिटनेस कॅम्पमध्ये दिसून आले नाहीत. हे खेळाडू दुखापत ग्रस्त असून यातून सावरण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. इफ्तिकार अहमद हा थकावटीमुळे या रेसमध्ये भाग घेतला नाही.

कॅम्पसाठी निवडण्यात आलेले 29 खेळाडू

बाबर आझम, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, मेहरान मुमताज, अबरार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, इरफान खान नियाझी, शादाब खान, इमाद वसीम, उसामा मीर, नसीम शाह, सईम अय्युब, फखर जमान, इफ्तिखार अहमद, अब्बास आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद अली, जमान खान, साहबजादा फरहान, हसिबुल्ला, सौद शकील, उस्मान खान, मोहम्मद हरीस, सलमान अली आगा, आझम खान, मोहम्मद वसीम जूनियर, आमिर जमाल, हरिस राऊफ आणि मोहम्मद आमिर.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *