IND  vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहली करणार युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, अंतिम सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस..

IND  vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहली करणार युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, अंतिम सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस..

IND  vs AUS:  विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या अंतिम फेरीचा टप्पा पूर्णपणे तयार झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील हा सामना रविवार, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यावेळी प्रत्येक भारतीय एवढीच प्रार्थना करत आहे की, भारत कसा तरी या विश्वचषकाची फायनल जिंकेल आणि तिसरी विश्वचषक ट्रॉफी देशाला भेट देईल.

यावेळी भारतीय संघ ज्या प्रकारे खेळत आहे ते पाहिल्यानंतर प्रत्येक क्रिकेट तज्ञ भारतालाच फेव्हरेट मानत आहेत पण भारताला इतिहास रचायचा असेल तर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खांद्यावर असेल. या दोन्ही खेळाडूंसाठी हा अंतिम सामना खास असेल कारण हे दोघेही युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

World Cup Final: सर्व फ्लाईट फुल तर हॉटेलचा किराया सुद्धा 10 पट वाढला, भारत-ऑस्ट्रोलिया अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पैश्याची उलाढाल.

IND  vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहली करणार युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

IND vs NZ live: पहिल्या सेमिफायनलमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, ख्रिस गेल ला मागे सोडत केली अशी कामगिरी..

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा अंतिम सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी सातवा ICC फायनल असेल आणि ते सर्वाधिक ICC फायनल खेळण्याच्या युवराज सिंगच्या (7) विक्रमाची बरोबरी करतील. आत्तापर्यंत, रोहित आणि विराटने 6-6 ICC फायनलमध्ये भाग घेतला आहे, त्यामुळे ते त्यांच्या सातव्या ICC फायनलमध्ये देशाला तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची भेट देऊ इच्छित आहेत.

त्याचवेळी या विश्वचषकाच्या फायनलबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) देखील या शानदार सामन्यासाठी पंचांची घोषणा केली आहे आणि पंचांच्या यादीत एक नाव आहे ज्याने भारतीय चाहते घाबरले आहेत कारण हे पंच टीम इंडियाकडून आहे. तो कितीही निर्णायक सामना खेळला आहे, त्यात भारताला पराभवाशिवाय काहीही मिळालेले नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या या विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये रिचर्ड कॅटलबर्ग आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच असतील तर तिसरे पंच जोएल विल्सन असतील. याशिवाय सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असतील. या यादीत सर्व काही ठीक आहे परंतु रिचर्ड कॅटेलबर्गचे नाव चाहत्यांना घाबरवत आहे. 2014 पासून आतापर्यंत, कॅटेलबर्ग टीम इंडियाच्या 7 नॉकआऊट सामन्यांमध्ये ऑन-फिल्ड अंपायर किंवा थर्ड अंपायर होते आणि प्रत्येक वेळी त्यांच्या नियंत्रणाखाली भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

IND  vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहली करणार युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी, अंतिम सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस..

या अंतिम सामन्यात पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखी गत होऊ नये अशीच प्रार्थना संपूर्ण 140 कोटी भारतीय नागरिक करत असतील.. विश्वचषक 2023 चा अंतिम सामना उद्या (19 Nov) ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुपारी 2वाजता पासून खेळवला जाणार आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *