‘हे 4 संघ सेमीफायनमध्ये पोहचतील’ विश्वचषक 2023 बद्दल युवराज सिंगचे मोठे वक्तव्य!

0
2264
ad

‘हे 4 संघ सेमीफायनमध्ये पोहचतील’ विश्वचषक 2023 बद्दल युवराज सिंगचे मोठे वक्तव्य!


५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे, यावेळी एकदिवसीय विश्वचषक भारताच्या भूमीवर खेळवला जाणार आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत नंबर 1संघ मानला जात आहे. त्याशिवाय इत्र्र दिग्गज खेळाडूह विश्वचषक 2023 साठी आपापले मत व्यक्त करत आहेत. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने देखी विश्वचषक कोण जिंकेल यावर आपले मत व्यक्त केले आहे. नक्की युवराज काय म्हणाला पाहूया सविस्तर..

विश्वचषक 2023 बद्दल युवराज सिंगचे मोठे वक्तव्य..

आजपासून सुरु होणाऱ्या विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने आपले संघ निवडले आहेत जे सेमीफायनल मध्ये खेळतांना दिसू शकतात. युवराजने  4 संघांची नावे दिली आहेत जे विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत खेळताना दिसू शकतात. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीतील प्रवेशाचे मोठे दावेदार आहेत, पण दक्षिण आफ्रिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे युवराजचे मत आहे.

Odi Worldcup 2023: आजपासून विश्वचषक 2023 ला सुरवात, पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड एकमेकांना भिडणार, असे असू शकतात दोन्ही संघ आणि त्यांचे प्लेईंग 11

युवराज सिंगने सांगितले की, “भारत, ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत असतील. मी पाच संघ निवडेन कारण विश्वचषकात नेहमीच अपसेट असतात. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि मला वाटते की दक्षिण आफ्रिका आश्चर्यचकित करू शकते. त्यांना व्हाईट-बॉल ट्रॉफी हवी आहे.”

2011 च्या विश्वचषक युवराज सिंगने खूप गाजवला होता, जेव्हा त्याला टूर्नामेंटचा खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.युवराजला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श, भारताचा रवींद्र आणि इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर यांची नावे घेतली. युवराजने स्टोक्सला सर्वोत्तम ऑलराउंडर म्हटले आहे. आणि या विश्वचषकात तो अनेक सामना वीर पुरस्कार जिंकू शकतो, असेही युवराज म्हणाला.

'हे 4 संघ सेमीफायनमध्ये पोहचतील' विश्वचषक 2023 बद्दल युवराज सिंगचे मोठे वक्तव्य!

जगात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत पण स्टोक्स सध्या नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडने त्याला विश्वचषकासाठी परत बोलावले आहे. उल्लेखनीय आहे की, स्टोक्सने विश्वचषकासाठी एकदिवसीय निवृत्तीतून यू-टर्न घेतला आहे. 2019 साली इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. तशीच काहीसी कामगिरी तो या विश्वचषकामधे सुद्धा करेल.


हेही वाचा:

“मला आता सवय झाली आहे..” वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे युजवेंद्र चहल नाराज, पहिल्यांदाच बोलत केला मोठा खुलासा..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.