भारतीय कर्णधार: भारतीय क्रिकेट संघाला सौरव गांगुली याच्यानंतर यशस्वी कर्णधारांची परंपरा लाभली आहे. या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि आता रोहित शर्मा यांनी भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. विश्वचषकात देखील या खेळाडूंची आकडेवारी दमदार आहे. आज आपण विश्वचषकात या कर्णधारानी किती सलग सामन्यात विजय मिळवून दिला आहे याची माहिती पाहणार आहोत.
महेंद्रसिंग धोनी: 2011 आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावरती होती. त्याने भारतीय संघाला सलग 11 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघ त्याच्याच नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला होता. धोनीने सलग 11 सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून दिले आहेत.
सौरव गांगुली: 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान ही सौरव गांगुलीच्या खांद्यावर होती. दादाने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सलग आठ सामन्यात विजयी ठरला होता.
रोहित शर्मा : 2023 विश्वचषक स्पर्धा ही भारतात होत आहे. यंदा भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रोहित शर्मा कडे सोपवण्यात आली आहे. रोहितनेही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत सलग 11 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत अपराजित आहे.
विराट कोहली: 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग 5 सामन्यात विजय मिळवला होता. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध खेळताना पराभव झाला होता.
या पराभवाचा बदला भारतीय संघाने 2023 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत घेतला. भारतीय संघाला आणखीन विश्वचषक स्पर्धेत चार साखळी सामने खेळायचे आहे. भारताने सेमी फायनल आणि फायनल चा सामना खेळला तर रोहित शर्माला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकते.
कपिल देव: 1983 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली उतरला होता. नेतृत्वात अत्यंत कुशल असलेले कपिल देव यांनी भारतीय संघाला सलग पाच सामन्यात विजय मिळवून दिला होता. तसेच त्यांच्याच नेतृत्वाखाली या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्टइंडीज संघाचा त्यांनी 36 धावांनी दारुण पराभव केला होता.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..