विश्वचषक 2023 मध्ये रोहित शर्मा पूर्णत: रंगात दिसून येत आहे. त्याच्या स्फोटक फलंदाजी पुढे सर्वच गोलंदाज निष्प्रभ, हताश आणि निराश दिसून येत आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यात बॅटने कमाल करणारा रोहित आता बॉलने धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्वचषकातील भारताचा चौथा सामना बांगलादेश विरुद्ध उद्या गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नेट सेशनमध्ये फलंदाजी सोडून गोलंदाजीचा सराव करताना दिसून आला.

रोहित शर्मा गोलंदाजी करतानाचा एक छोटासा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा याला रोहित शर्मा गोलंदाजी करताना दिसतोय. आपल्या ऑफ स्पीनने रोहित शर्माने जडेजाला अनेकदा चक्रावून सोडले. रोहित गोलंदाजी करतेवेळी ऑफ स्पिनर आर अश्विन हा त्याच्याजवळ थांबून त्याला फिरकी गोलंदाजीमधले बारकावे शिकवत होता.
या व्हिडिओवरून उद्या रोहित शर्मा बांगलादेश विरुद्ध खेळताना गोलंदाजी करताना दिसू शकतो असा अंदाज लावला जात आहे. विश्वचषक 2023 मध्ये काही छोटे-मोठे संघ मोठ्या संघांना धक्का देत आहेत. म्हणून उद्याच्या सामन्यासाठी रोहित शर्माने गाफील राहणे टाळत आहे. यासाठी तो आता स्वतः गोलंदाजीला सुरुवात केली आहे. संघात आर. अश्विन सारखा दिग्गज खेळाडू बेंचवर बसून आहे. त्याला संघात घेण्याऐवजी रोहित शर्मा गोलंदाजीचा सराव का करतोय? असा प्रश्न क्रिकेट समीक्षकांना पडला आहे. यावरून उद्याच्या सामन्यातही आर. अश्विन खेळणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
रोहित शर्माने 254 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आठ गडी बाद केले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने 12 जानेवारी 2016 मध्ये शेवटच्या सामन्यात गोलंदाजी केली होती. तर T20 क्रिकेट मध्ये 2012 साली गोलंदाजी केला होता. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळताना बॉलिंग चेंज म्हणून गोलंदाजी करताना दिसला. एक पार्ट टाइम स्पिनर म्हणून तो कधीकाळी गोलंदाजी करत होता. फलंदाजीत लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी गोलंदाजी सोडून दिल्याचे यापूर्वी सांगितले होते. तसेच भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज हे चांगली गोलंदाजी करत असल्यामुळे संघाला कधीही पार्ट टाइम स्पिनरची गरज भासली नाही.
आपल्या बॅटने तडाखेबाज खेळी करणाऱ्या रोहितने आयपीएलमध्ये पंधरा विकेट देखील घेतले आहेत. 2009 मध्ये तो एडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जेस या संघाकडून खेळत होता. त्यावेळी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने हॅट्रिक घेत सर्वांना चकित करून सोडले.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी