जसा सासरा तसा जावई! शाहीन शहा ने केली आफ्रिदीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी, सासऱ्याच्या पंगतीत जाऊन बसला जावाई.

 शाहीन शहा आफ्रिदी:   पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीनशहा आफ्रिदी याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पाच विकेट बाद करण्याचा कारनामा केला आहे. सलग दोन विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळताना त्याने हे कामगिरी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती. यासह त्याने त्याचा सासरा शाहिद आफ्रिदी याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.


 शाहीन शहाआफ्रिदी: 

 शाहीन शहा आफ्रिदी ने केली सासऱ्यांच्या विक्रमाशी बरोबरी.

शाहिद आफ्रिदीने 27 सामन्यात 2 वेळा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. आफ्रिदीच्या या विक्रमाची बरोबरी त्याचा जावई शाहीनशहा आफ्रिदीने केली आहे. विश्वचषक स्पर्धेत दोनदा पाच विकेट घेणारे पाकिस्तानचे हे दोनच खेळाडू ठरले आहेत. शाहीनशहा आफ्रिदीने विश्वचषक स्पर्धेत पाच विकेट घेणारा सर्वात कमी वयाचा युवा खेळाडू ठरला आहे. 2019 मध्ये लॉर्ड च्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याने 33 धावा देत सहा गडी बाद केले होते.

शाहीनशहा आफ्रिदी कालच्या सामन्यात छाप सोडत 10 षटकात 54 धावा देत ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज माघारी धाडले. मागील तीन सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात 37 धावा देत एक बळी, श्रीलंके विरुद्ध 66 धावात एक बळी तर भारताविरुद्ध खेळताना 36 धावा देत दोन गडी बाद केले होते. विश्वचषक स्पर्धेतल्या चार सामन्यात त्याला केवळ नऊ गडी बाद करता आले.

आफ्रिदी

शाहीन शाह आफ्रिदीयाने विश्वचषक स्पर्धेत एकूण 9 सामने खेळले आहेत, त्यात त्याला 25 बळी टिपता आले. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिल्यास तो नवनवीन विक्रम रचु शकतो. कालच्या 18 व्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. पाच वेळाचा चॅम्पियन असलेल्या या टीमचा यंदाच्या स्पर्धेतला हा त्यांचा दुसरा विजय आहे.

सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पाचारण केले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 बाद 366 इतक्या डोंगराएवढया धावा केल्या. प्रतिउत्तरात पाकिस्तानचा संघ 45.3 षटकात 305 धावांवर सर्वबाद झाला. विश्वचषक स्पर्धेतला पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे तर ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. पुढच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर विश्वचषक स्पर्धेत त्यांचा प्रवास येथेच संपवू शकतो.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *